You are here
मुख्य पृष्ठ » सिटिज़न चार्टर
सिटिज़न चार्टर
संसदीय कार्य विभाग,
मंत्रालय विस्तार इमारत
पोटमाळा,दालन क्र.एम-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय,मुंबई- ४०० ०३२
पोटमाळा,दालन क्र.एम-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय,मुंबई- ४०० ०३२
दूरध्वनी क्र.
०२२-२२०२८०९२
०२२-२२०४६९०७
०२२-२२७९३४१८
०२२-२२७९३३९६
नागरिकांच्या माहितीसाठी विभागाच्या कामकाजाचा तपशिल
संसदीय कार्य विभाग
विभागाची संक्षिप्त माहिती
१. विधान कार्याशी निगडीत विविध बाबींचे काम यापूर्वी सामान्य प्रशासन विभाग आणि विधि व न्याय विभाग यांच्यामध्ये हाताळण्यात येत होते व त्यामुळे सदरहू कामांचे सुयोग्यरित्या समन्वय साधून ही कामे अधिक परिणामकारकरित्या पार पाडण्यासाठी, केंद्र शासनाच्या धर्तीवर विधान कार्य विभाग या नावाचा स्वतंत्र विभाग दिनांक १ जुलै,१९७५ मध्ये अस्तित्वात आला. तसेच, त्या विभागाचे नाव दिनांक ३० जून,१९७८ पासून संसदीय कार्य विभाग असे,बदलण्यात आले.
१. विधान कार्याशी निगडीत विविध बाबींचे काम यापूर्वी सामान्य प्रशासन विभाग आणि विधि व न्याय विभाग यांच्यामध्ये हाताळण्यात येत होते व त्यामुळे सदरहू कामांचे सुयोग्यरित्या समन्वय साधून ही कामे अधिक परिणामकारकरित्या पार पाडण्यासाठी, केंद्र शासनाच्या धर्तीवर विधान कार्य विभाग या नावाचा स्वतंत्र विभाग दिनांक १ जुलै,१९७५ मध्ये अस्तित्वात आला. तसेच, त्या विभागाचे नाव दिनांक ३० जून,१९७८ पासून
३. या विभागमध्ये रोख शाखेसह ६ कार्यासने कार्यरत असून, सचिव हे विभागप्रमुख आहेत. विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव (विधी विधान), विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या विभागामध्ये एकून ३७ पदे मंजूर असून त्यामध्ये सचिव, उप सचिव, अवर सचिव, उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी), गोपनीय लिपिक, रोखपाल, देयक लेखापाल यांचे प्रत्येकी १ पद तसेच कक्ष अधिकारी - ५, सहायक कक्ष अधिकारी - ८ व लिपिक-टंकलेखक - ९ व वर्ग-चार मधील ७ पदे यांचा समावेश आहे.
४. या विभागाच्या कामाचे स्वरूप इतर मंत्रालयीन विभागाच्या कामापेक्षा भिन्न स्वरूपाचे असून, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि इतर मंत्रालयीन विभाग यांच्यामध्ये प्रामुख्याने विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात समन्वय साधण्याचे काम हाताळण्यात येते. त्या कामामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाची वर्षभरात सर्वसाधारणपणे तीन अधिवेशने अभिनिमंत्रित करणे व ती संस्थगित करणे या करिता मा. राज्यपाल महोदयांचे आदेश प्राप्त करून ते महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास पाठविणे. तसेच, प्रत्येक वर्षाच्या प्रारंभीच्या होणाऱ्या अधिवेशनात आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात मा.राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रारूपाची तयारी करणे याचा समावेश आहे. प्रस्तुत अधिवेशनांपैकी पहिली दोन म्हणजेच अर्थसंकल्पीय व पावसाळी, ही अधिवेशने मुंबईत होतात व हिवाळी अधिवेशन प्रथेनुसार नागपूर येथे होते. प्रस्तुत कामाशिवाय विधानमंडळाचे मा.पीठासीन अधिकारी, विरोधी पक्षनेते, मंत्री, राज्यमंत्री व सदस्य यांचे वेतन व भत्तेविषयक अधिनियमांमध्ये सुधारणा करणे. तसेच,विधानमंडळाच्या विधानपरिषद व विधानसभा या उभय सभागृहांत अधिवेशन काळात शासनाच्यावतीने दिलेली आश्वासने संबंधित विभागांना पूर्ततेसाठी पाठविणे व त्या विभागांकडून प्राप्त झालेली पूर्ततेची विवरणपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे ही कामे देखील हाताळली जातात. या विभागामधील कार्यासनांमध्ये हाताळण्यात येत असलेल्या कामांचा तपशिल सोबत जोडलेल्या विवरणपत्र – एक मध्ये दिला आहे.
५. या विभागाचे कामकाजाचे एकंदर स्वरूप पाहता, या विभागाकडून राज्य शासनाच्या अथवा केंद्र पुरस्कृत कोणत्याही योजना अथवा कार्यक्रम राबविण्यात येत नाहीत. तसेच, नागरिकांशी संबंधित कोणत्याही सेवा पुरविण्यात येत नाहीत.त्याशिवाय, या विभागाच्या अधिपत्याखाली कोणतीही क्षेत्रीय कार्यालये / संस्था / मंडळे / महामंडळे कार्यरत नाहीत.
"विवरणपत्र –एक”
माहितीचा अधिकार अधिनियम २००५च्या कलम ४ च्या पोटकलम(१) च्या खंड(ख) खालील मुद्दा क्रमांक (दोन) नुसार संसदीय कार्य विभागाच्या विषयांची कार्यासन निहाय यादी
कार्यासन-दोन (विधानमंडळ सदस्यांच्या सोयी-सुविधा, अर्थसंकल्प) |
कार्यासन-तीन (भांडारशाखा) |
कार्यासन-चार (विधानपरिषद आश्वासने) |
---|---|---|
१ कक्ष अधिकारी, १ सहाय्यक कक्ष अधिकारी, १ लिपिक-टंकलेखक |
१ कक्ष अधिकारी, १ सहाय्यक कक्ष अधिकारी १ लिपिक-टंकलेखक |
१ कक्ष अधिकारी २ सहाय्यक कक्ष अधिकारी १ लिपिक-टंकलेखक |
१) विधानमंडळाचे मा पीठासीन अधिकारी, विरोधीपक्षनेते, मंत्री आणि विधानमंडळ सदस्य यांच्या वेतन व भत्तेविषयक बाबी अंतर्भूत असलेली प्रकरणे. २) मा.राज्यपालांचे अभिभाषणाच्या प्रारूपाची तयारी करणे, विभागाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे. |
१) विभागातील लेखनसामग्री खरेदीची प्रकरणे व गृह व्यवस्थापन २) शासकीय व अशासकीय विधेयकासंबंधी प्रकरणे, ३)प्रतोद परिषदेच्या बाबी |
१) विधानपरिषद सभागृहात प्रत्येक अधिवेशनात शासनामार्फत देण्यात आलेली आश्वासने तपासून व चिंन्हाकित करुन संबधित विभागांकडे पूर्ततेसाठी पाठविणे २) संबंधित विभागांकडून प्राप्त झालेली आश्वासन पूर्ततेची विवरणपत्रे विधानपरिषदेच्या सभागृहात पटलावर ठेवणे. ३) विधानमंडळ कामकाज संकीर्ण बाबी |
कार्यासन-पाच (आस्थापना व विधानमंडळ कामकाज समन्वय) | कार्यासन-सहा (विधानसभा आश्वासने) | रोखशाखा |
---|---|---|
१ कक्ष अधिकारी २ सहाय्यक कक्ष अधिकारी १ लिपिक-टंकलेखक |
१ कक्ष अधिकारी २ सहाय्यक कक्ष अधिकारी १ लिपिक-टंकलेखक |
१ आहरण व संवितरण अधिकारी १ रोखपाल १ देयक लेखापाल रोखशाखेशी संबंधित सर्व प्रकरणे |
१) विभागातील आस्थापना-विषयक सर्व बाबी २) विधानमंडळाच्या अधिवेशनाशी संबंधित कामकाज ३) विधानमंडळाचे अधिवेशन अभिनिमंत्रित व संस्थगित करण्यासंबंधी मा. राज्यपालांचे आदेश प्राप्त करणे, विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेविषयक बाबी ४) अर्थसंकल्प व पुरवणी मागण्या सादर करण्यासबंधित मा. राज्यपालांचे आदेश प्राप्त करण्यासंदर्भातील बाबी |
१)विधानसभा सभागृहात प्रत्येक अधिवेशनात शासनामार्फत देण्यात आलेली आश्वासने तपासून व चिन्हांकित करून संबंधित विभांगाकडे पूर्ततेसाठी पाठविणे. २) संबंधित विभागांकडून प्राप्त पूर्तता झालेली आश्वासन पूर्ततेची विवरणपत्रे विधानसभेच्या सभागृहात पटलावर ठेवणे. ३) विभागाचे ग्रंथालय |
नोंदणी शाखा
१)लिपिक तथा नोंदणी प्रभारी- आवक-जावक टपालाची नोंद घेणे व नोंदणी शाखेशी संबंधित सर्व कामे |