बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    संसदीय कार्य विभागाचे स्वरुप इतर मंत्रालयीन विभागांपेक्षा भिन्न आहे. संसदीय कार्य विभागामार्फत प्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात.

    1. महाराष्ट्र विधानमंडळाची अधिवेशने अभिनिमंत्रित करणे व संस्थगित करणे याकरीता मा.राज्यपाल महोदयांचे आदेश घेणे.

    2. प्रत्येक वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या अधिवेशनात आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात होणाऱ्या मा.राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रारुपाची तयारी करणे.

    3. महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या व अतिरिक्त खर्चाच्या मागण्या मांडणे याकरिता दिवस नेमून देण्यासाठी मा.राज्यपाल महोदयांचे आदेश घेणे.

    4. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानमंडळ सचिवालय व मंत्रालयीन विभाग यात समन्वय साधणे.

    5. विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी, मंत्री, विरोधी पक्षनेते तसेच सदस्य यांचे वेतन व भत्तेविषयक अधिनियमांमध्ये सुधारणा करणे.

    6. विधीमंडळाच्या सभागृहांत अधिवेशन काळात शासनाच्यावतीने दिलेली आश्वासने विधानमंडळ सचिवालय यांचेकडून निश्चित केल्यानंतर, सदर आश्वासने संबंधित मंत्रालयीन विभागांना पूर्ततेसाठी पाठविणे व मंत्रालयीन विभागांकडून प्राप्त झालेली आश्वासन पूर्ततेची विवरणपत्रे आगामी आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवणे.